पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा निर्णय

Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा निर्णय

मोदींच्या वाढदिवसानिमित्त जन्मलेल्या मुलांना देणार सोन्याच्या अंगठ्या भाजपच्या तामिळनाडू युनिटने केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. शनिवारी त्यांचा वाढदि

काँग्रेसला आपल्याच नेत्यांची गॅरंटी नाही
पंतप्रधान मोदी उद्या करणार जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे उद्घाटन
इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. शनिवारी त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी विविध तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपच्या तामिळनाडू युनिटने विशेष व्यवस्था केली आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त जन्मलेल्या मुलांना सोन्याच्या अंगठ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दिवशी 720 किलो मासळीचे वाटप करण्याचीही योजना आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसादिवशी 17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. प्रत्येक अंगठीचे वजन सुमारे दोन ग्रॅम तर किंमत 5000 रुपये असेल.

COMMENTS