Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्रिपदावरून मविआत रस्सीखेच

मुंबई ः महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने प्रचार करत असली तरी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत

करोडपती?….नव्हे , तो आला रोड वरती ; लकी विनर मेसेजद्वारे एकाला सव्वा लाखाला गंडा
मालेगावात 35 हून अधिक घरे आगीत भस्मसात
आमदार अपात्रतेचा फैसला लवकरच

मुंबई ः महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने प्रचार करत असली तरी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. तर ज्यांच्या सर्वाधिक जागा निवडून येईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री अशी  इतर पक्षाची भूमिका आहे. त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी किमान पडद्याआड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाच्या चेहर्‍यावरुन महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. 16 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महाविकास आघाडीचा मेळावा पार पडलेला. यामध्ये बोलताना विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, जे नाव जाहीर केले जाईल, त्याला आपला पाठिंबा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण ठाकरेंच्या या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. त्यामुळे किमान चार भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतल्याचे दिसून येत आहे. 

COMMENTS