Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात प्रेमीयुगुलाचा करूण अंत

जंगलात आढळले दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेतशिरगाव (ता. राधानगरी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आल्य

Kolhapur : चंदगड तालुक्यातील उमगाव भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ (Video)
किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव
Chandgad : शिक्षकच देशाचे भवितव्य घडवितात. -आ.जयंत आसगावकर (Video)

जंगलात आढळले दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत
शिरगाव (ता. राधानगरी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शेळेवाडी येथील ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय 28) आणि तरसंबळे येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने जंगल परिसरात जाऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती तरसंबळेचे पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात ही घटना किमान चार दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहांमधून दुर्गंधी येत असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती एका शेतकर्‍याच्या निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले असावे, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. मात्र, नेमके कारण काय याचा सखोल तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. ओंकार बरगे हा कष्टाळू, मनमिळाऊ स्वभावाचा तरुण म्हणून ओळखला जात होता. तो बिद्री साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुकीचा व्यवसाय करत होता. गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही तो सक्रिय सहभाग घेत असे. त्याच्या पश्‍चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण राधानगरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, अशा दुर्दैवी घटनेमागील कारणांचा लवकरात लवकर उलगडा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. राधानगरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS