सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून पाहिले जातात. त्य
सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून पाहिले जातात. त्यातील काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहतो.असाच एका चिमुरड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाकाय अजगरासोबत एक चिमुरडा अगदी बिनधास्त खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांच्या काळजात धस्स होतंय मात्र तो चिमुरडा मात्र कसलीच काळजी नसल्यागत अजगरासोबत खेळतोय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ २०१८मध्ये युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ काढून तो नंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. ही घटना इंडोनेशियातील जावा प्रांतातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या युट्यूबवरुन हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे. मात्र, फेसबुक आणि ट्विटवर मात्र तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Figen नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना बेजबाबदार पालक असंही कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडओत, तीन ते चार वर्ष वय असलेला चिमुरडा कोणतीही भीती मनात न बाळगता अजगरासोबत खेळत आहे. तो कधी त्यांचे तोंड गोंजारत आहे. तर, कधी त्याच्या अंगावर खेळत आहे. एका क्षणाला अजगराने चिमुरड्याला वेटोळे घातल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी मुलाच्या धाडसाचे कौतुक केलं आहे तर काहींनी त्याच्या पालकांना बेजबाबदार म्हटलं आहे.
COMMENTS