Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारचा दरवाजा उघडल्याने तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे ः पुण्यातील आकुर्डी गावठण येथील चौकात अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वार मुलांसह रस्त्यावर पडला. याचवेळी पाठीमागून येणार्‍या बोलेरोखाल

महामानवांचा अवमानप्रकरणी जामखेडकरांनी पाळला बंद
मला ईडीची नोटीस दिली आणि संबंध महाराष्ट्राने भाजपाला येडी ठरवल…
निवडणूक आयोगाकडून अजित पवारांसह बावनकुळेना नोटीस

पुणे ः पुण्यातील आकुर्डी गावठण येथील चौकात अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वार मुलांसह रस्त्यावर पडला. याचवेळी पाठीमागून येणार्‍या बोलेरोखाली आल्याने तीन वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत आदेश विष्णु विचारे (वय-42,रा.निगडी प्राधिकरण,पुणे) यांनी महिंदा सुप्रो कंपनीची कार (एमएच 14 केए 6409) व बोलेरो पिकअप गाडी (एमएच 14 के ए 6409) या वाहनचालकांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडोबाच्या दर्शनाला दुचाकीवरून मुलांना घेऊन जात असताना रस्त्यावरील कारचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे दुचाकीस्वारासह दोन्ही मुले रस्त्यावर पडली. याचवेळी पाठीमागून येणारी भरधाव बोलेरो पिकअप तीन वर्षीय मुलाच्या अंगावरून गेली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. अपघातानंतर दोन्ही वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेले असून याबाबत निगडी पोलीस पुढील तपास करत आहे.

COMMENTS