Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेत ठाकरेंचा तीन लाख कोटींचा घोटाळा

भाजप नेते अमित साटम यांचा गंभीर आरोप मुंबई ः मुंबई महानगरपालिकेतील गेल्या अडीच दशकांच्या कारभारावर गंभीर प्रश्‍न उपस्थित करत भाजपचे मुंबई अध्यक्ष

मशाल थंडावली, इंजिनची गतीही संपली ः सरनाईक यांची टीका
मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर निश्‍चित
शिंदेंचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात !

भाजप नेते अमित साटम यांचा गंभीर आरोप
 मुंबई ः मुंबई महानगरपालिकेतील गेल्या अडीच दशकांच्या कारभारावर गंभीर प्रश्‍न उपस्थित करत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 1997 ते 2022 या कालावधीत मुंबई पालिकेत देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची मालिका घडली असून ठाकरेंनी मुंबईत तीन लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप साटम यांनी केला.
साटम यांच्या मते, देशात गाजलेल्या 2जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा किंवा कॉमनवेल्थ प्रकरणांतील भ्रष्टाचाराची रक्कम एकत्रितपणे सुमारे दीड ते दोन लाख कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होती. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्‍वभूमीवर, जर पुन्हा ठाकरेंचा महापौर सत्तेत आला, तर मुंबईच्या भवितव्याला गंभीर धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई महापालिकेच्या ढासळलेल्या अवस्थेवर भाष्य करताना साटम यांनी आपल्या भावना काव्यात्मक शब्दांत व्यक्त केल्या. एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी शहराची अवस्था, नागरिकांची वेदना आणि दीर्घकाळ सुरू असलेल्या कथित लुटीवर बोट ठेवले. या कवितेतून मुंबईला ओरबाडणार्‍यांचा हिशेब जनता एक दिवस नक्कीच मागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मुंबईच्या पायाभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित करताना साटम यांनी विशेषतः रस्त्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधले. रस्त्यांच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. गेल्या काही वर्षांत रस्ते विकासाच्या कामांसाठी सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला, मात्र प्रत्यक्षात शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांचाच सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS