Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

जन्मदात्या बापानेच केले पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण

अकोला : बदलापूरची घटना ताजी असतानाच अकोल्यात जन्मदात्या बापानेच आपल्या 10 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्या

धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण
संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये गीता जयंती उत्साहात
देवळाली प्रवरात गुरुवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ

अकोला : बदलापूरची घटना ताजी असतानाच अकोल्यात जन्मदात्या बापानेच आपल्या 10 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्रास सहन न झाल्याने मुलीने अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.  
अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलीच्या दूरच्या नातेवाईकाने अत्याचार केला होता. मुलीला नातेवाईकांकडे ठेवून आई वडील बाहेर गेले असताना याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अकोटफैल पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  दुसरीच्या वर्गात असल्यापासून वडील अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने दिली. पीडित मुलीच्या या तक्रारीनंतर वडिलांवर देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.  सद्यस्थितीत अत्याचार करणारा दूरचा नातेवाईक आणि वडील हे दोघेही अटकेत आहेत. दरम्यान, अत्याचार करणार्‍या वडील आणि नात्यातील मामावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

COMMENTS