Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरात मांज्यामुळे दहा वर्षाचा मुलगा जखमी

गळ्याला जखम शहरात मांजा विक्री सुरूच

राहाता प्रतिनिधी ः शहरामध्ये एक दहा वर्षीय मुलगा खेळत असतांना, मांज्यामुळे त्याच्या गळ्याला जखम झाली झाली. दैव बलवत्तर म्हणून हा मुलगा थोडक्यात ब

औद्योगिक क्लस्टरच्या अडचणी केंद्र सरकार सोडवणार : गड़करी
प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात अनेकांना नोकरी
नेवासाफाटा, सुरेशनगर, हंडीनिमगाव परिसराचा वीज पुरवठा नेवासा सबस्टेशनला जोडण्याची मागणी

राहाता प्रतिनिधी ः शहरामध्ये एक दहा वर्षीय मुलगा खेळत असतांना, मांज्यामुळे त्याच्या गळ्याला जखम झाली झाली. दैव बलवत्तर म्हणून हा मुलगा थोडक्यात बचावला. मात्र यानिमित्ताने सर्रास सुरू असलेल्या मांज्याच्या विक्रीवर वरदहस्त कुणाचा असा सवाल उपस्थित होत आहे. कारण राहाता शहरात सर्रास नायलान मांजा विक्री सुरू आहे.मात्र नगरपालिका प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
रोड वरून ये जा करणारे नागरिक यांना इजा होतो त्यामध्ये काहींचे जीवही गेल्याचे समोर आलेले आहे परंतु याबाबत प्रशासन किती गाफील आहे याचे उत्तम उदाहरण आज शहरात बघायला मिळाले शासनाने नायलान मांजा वर बंदी घातलेली असताना कुणाच्या आशीर्वादाने दुकानदार नायलान मांजा विक्री करतात असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक करत आहे यापूर्वी नायलान मांज्यामुळे अनेक नागरिकांना इजा झाल्याची घटना समोर आली आहे. जर यामुळे कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?तरी याबाबत आता नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करत नायलान मांजा विक्री करणार्‍या दुकानदारांवर कडक कारवाई करावी तसेच राहाता शहरात काही दिवसापुर्वी अवैध्यरीत्या चालणार्‍या बिंगो या जुगारावर अहमनगर व राहाता येथिल पोलिस प्रशासनाने संयुक्तिक कारवाई करत सुमारे 23 आरोपी विरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल करत लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता आता बंदी असलेल्या नायलान मांजा विक्री करणार्‍या वर राहाता पोलिसच कालवाई करणार की संयुक्तपणे कारवाईचा दुग्धशर्करा योगाची वाट पाहावि लागणार? अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

पुढील काही दिवस या मांज्यामुळे कुठलीही इजा होऊ नये म्हणून नागरिकांनी संरक्षण म्हणून आपला चेहर्‍यापासून गळ्यापर्यंत स्कार्प वापरावे. डॉ.संतोष मोकळं (एम.एस.सर्जन)

COMMENTS