Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहा महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडून मृत्यू

पनवेल प्रतिनिधी - घरामध्ये खेळता खेळता एका १० महिन्यांच्या बाळाचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पनवेलमधील पळस

साऊथ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन
संजय राऊतांच्या विरोधातील महिलेच्या तक्रारीची मुंबई हायकोर्टाने घेतली दखल
एमपीएससींच्या परीक्षांचे शुल्क कमी करा

पनवेल प्रतिनिधी – घरामध्ये खेळता खेळता एका १० महिन्यांच्या बाळाचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पनवेलमधील पळस्पे गावात रविवारी (ता. ५) दुपारी घडली. आशिक अल इमान असे बाळाचे नाव आहे. अशिकची आई घरामध्ये झोपली असताना, आशिक घरात खेळत होता. खेळता खेळता तो बाथरूममध्ये गेला आणि पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. काही वेळाने आई झोपून उठल्यानंतर तिला आशिक दिसला नाही. शोधा शोध केल्यानंतर तो बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादलीत डोके उलथून पडलेला आढळून आला. तिने पतीला याची माहिती दिल्यानंतर त्याने तत्काळ घरी धाव घेऊन बाळाला कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

COMMENTS