Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं; ४ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने टॅक्सीला जोरद

ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील अपघातात तिघांचा मृत्यू
बुलढाण्यात भरधाव कारच्या धडकेत तीन महिला ठार

मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने टॅक्सीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले.थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सकाळी ८ वाजेच्या सुमारास टॅक्सी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टॅक्सी सुमारे ६० फूट दूर फेकली गेली.या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलिस करत आहे.

COMMENTS