Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याची हत्या

मुंबई ः इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याची हत्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दहावीच्या सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी अल्पवयीन आहेत

हिस्से वाटणीच्या कारणातून साडूची केली हत्या.
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या !
प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या

मुंबई ः इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याची हत्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दहावीच्या सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांना किशोर न्याय मंडळासमोर हजर केले असता शहरातील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तुर्भे येथील सामंत कॉलेजजवळील मैदानात झालेल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारी बारावीची दोन मुले जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी आदित्य भोसले (वय, 17) याला मृत घोषित करण्यात आले. तर, देवांग संदीप ठाकूर (वय, 17) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS