मुंबई : शिवाजी पार्क येथील प्रसिद्ध महाविद्यालयातील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार

मुंबई : शिवाजी पार्क येथील प्रसिद्ध महाविद्यालयातील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. परीक्षेत नक्कल (कॉपी) करताना त्याला पर्यवेक्षकांनी पकडले होते. त्यामुळे त्याने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. याबाबत तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लक्ष सतेंदर फर्मा (19) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो शिवाजी पार्क येथील प्रसिद्ध हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.
COMMENTS