Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांवरील अत्याचार प्रकरणी कठोर भूमिका घेण्यात यावी  

मानवतावादी समूहाची मागणी

बीड प्रतिनिधी - महिलांवरील  होणार्‍या लैंगिक अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली असून 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. यातील गुन्हे

पंजशीरच्या खोर्‍यात 350 तालिबान्यांचा खात्मा
दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशनच्या भितींवर भारत विरोधी घोषणांमुळे खळबळ
युद्ध थांबवण्यासाठी संगमनेरात हजारो महिलांचा कॅन्डल मार्च

बीड प्रतिनिधी – महिलांवरील  होणार्‍या लैंगिक अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली असून 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. यातील गुन्हेगारांना कायद्याने कठोरातील कठोर शिक्षा होईल अशी तरतूद करावी. तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक योजना आखल्या जाव्यात अशी मागणी मानवतावादी समूहाने जिल्हाधिका-यांकडे बुधवारी (दि.9) निवेदनाद्वारे केली आहे.
मागच्या काही काळात देशात आणि महाराष्ट्रातही महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मणिपूर ची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातही महिलेवर चालत्या गाडीत दोघांनी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. जिल्हयात अगदी अल्पवयीन मुली देखील सुरक्षित नाहीत. पाच वर्षाच्या बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वच संवेदनशील समाजाला हादरा बसावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण समाजमन अस्वस्थ आहे. त्यासोबतच शासन आणि प्रशासनाने समाजाला काळिमा फासणारे हे जघन्य अपराध गांभीर्याने घ्यावेत आणि यातील गुन्हेगारांना कायद्याने कठोरातील कठोर शिक्षा होईल अशी तरतूद करावी. तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक योजना आखल्या जाव्यात अशी मागणी बीडच्या  मानवतावादी  समूहाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रा.डॉ. हेमलता पाटील, प्राचार्य डॉ सविता शेटे, मनिषा तोकले, हेमा पोतदार, जयश्री सावंत, शुभांगी कुलकर्णी, उषा जाधव, मनिषा पवार, गीता कातखडे, अनिता पडुळे,  कौशल्या बावने, सुनील क्षीरसागर, अशोक तांगडे, प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, किरण घाडगे, संजय मालाणी, साहिल पटेल, अ‍ॅड. श्रीराम लाखे, डॉ संजय तांदळे, मारुती कोळी, सुदाम कोळेकर, वैजनाथ बोडवे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

COMMENTS