Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अट्टल गुन्हेगार येरवडा जेलमधून फरार

पुणे : राज्यातील सर्वाधिक मोठे आणि सुरक्षित जेल म्हणून ख्याती असलेल्या पुण्यातील येरवडा कारागृहातून भक्कम सुरक्षा भेदून खून प्रकरणातील एक अट्टल आ

येरवडा कारागृहात कैद्याची हत्या
येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात आढळला मोबाईल संच
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी येरवडा कारागृहातून पसार

पुणे : राज्यातील सर्वाधिक मोठे आणि सुरक्षित जेल म्हणून ख्याती असलेल्या पुण्यातील येरवडा कारागृहातून भक्कम सुरक्षा भेदून खून प्रकरणातील एक अट्टल आरोपी हा फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे येरवडा जेल प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा पुढे आला आहे. या घटनेमुळे करगृहाची सुरक्षा आणि येथील कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
येरवडा कारागृह राज्यातील सर्वात मोठे कारागृह आहे. या ठिकाणी कैद्यांमद्धे हाणामारीच्या घटना या सातत्याने होत असतात. तसेच कारागृहातून अनेक गैरकारभार देखील सातत्याने पुढे येत असतात. अशीच एक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. येरवडा कारागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक खुनाच्या घटनेतील अट्टल आरोपी हा फरार झाला आहे. आशीष जाधव असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2008 मध्ये आशीष जाधवने वारजे माळवाडी येथील एका व्यक्तिचा खून केला होता. त्या प्रकरणी आशिष जाधव येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला पडकण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. आशीष जाधव याचे शिक्षा भोगत असतांना चांगले वर्तन होते. त्याच्या वर्तनातील सुधार पाहून त्याला रेशन विभागात काम देण्यात आले होते. सोमवारी दुपारी कैद्याची मोजणी करण्यात आली असतांना त्यात आशिष जाधव आढळला नाही. यामुळे येरवडा कारागृह प्रशासनाची पळापळ झाली. आरोपी फरार झाल्याचे कळल्यावर त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

COMMENTS