अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय भटक्या विमुक्त अल्पसंख्यांक व दुर्बळ कैकाडी समाजास सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यासाठी शहराच्या आसपासच्या
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय भटक्या विमुक्त अल्पसंख्यांक व दुर्बळ कैकाडी समाजास सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यासाठी शहराच्या आसपासच्या परिसरात अहमदनगर महानगरपालिकेच्या राखीव जागा पैकी एखादी जागा मिळावी या मागणीसाठी स्थायी समितीच्या सभापती गणेश कवडे यांना निवेदन देताना प्रफुल्ल गायकवाड, डी.आर.गायकवाड, रवींद्र गायकवाड, के.एस.माने, किशोर जाधव, विशाल माने, हौसाराम गायकवाड आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हंटले आहे की मागासवर्गीय भटक्या विमुक्त अल्पसंख्याक व दुर्बळ कैकाडी समाजास अहमदनगर महानगरपालिकेच्या राखीव जागेपैकी शहराच्या नजीक असलेल्या एखादी जागा देण्यात यावी व समाजातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये फार कमी आहेत बहुतेक समाज बांधव बांधकाम, मजुरी, वॉचमन, जमीन खुदाई व माती काम करणे तसेच माता भगिनी धुनी भांडी व इतर मोलमजुरीचे कामे करून उदरनिर्वाह करतात त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी असून शैक्षणिक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास राहिलेल्या या समाजास उन्नती विकास व प्रगतीसाठी महानगरपालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
COMMENTS