हैदराबाद : प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरापासून 22 किमीवरील विष्णू निवासम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून 40 भाविक जखमी
हैदराबाद : प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरापासून 22 किमीवरील विष्णू निवासम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून 40 भाविक जखमी झाले आहे. तिरुपती मंदिरात गुरुवारी पहाटे वैकुंठद्वारावर दर्शन टोकन वाटप सुरू झाले होते. मात्र त्यासाठी बुधवारी संध्याकाळपासून भाविकांनी गर्दी कली होती. यादरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि यात 6 भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत.
वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजेच टीटीडी तिरुमला येथे 10 दिवस भाविकांना वैकुंठ द्वार दर्शन घेता येणार आहे. 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत दर्शन घेता येईल. 9 जानेवारीला पहाटे 5 वाजल्यापासून या द्वारावर दर्शन टोकन दिले जाणार होते. या टोकनसाठी भाविकांची गर्दी जमली होती. येथे टोकन जारी करण्यासाठी काउंटर उभारले आहेत. टोकन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. स्थानिक लोक तसेच इतर भागातील भाविक मोठ्या संख्येने काऊंटरवर पोहोचले. अचानक विष्णू धामच्या काऊंटरवर मारामारी सुरू झाली. त्यामुळे भीतीमुळे लोक इतरत्र पळू लागले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी आहेत.
COMMENTS