सातारा प्रतिनिधी - साताऱ्यात विचित्र अपघाताची घटना घडली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीस्वाराने तरुणाला धडक दिली आणि फरफटत नेलं. हा सगळा
सातारा प्रतिनिधी – साताऱ्यात विचित्र अपघाताची घटना घडली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीस्वाराने तरुणाला धडक दिली आणि फरफटत नेलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सातारा शहरातील कराड विद्यानगर रस्त्यावर ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका दुचाकी स्वाराने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या तरुणाला धडक दिली. दुचाकी स्वाराने या युवकाला धडक देत फरफटत घेऊन गेल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव दुचाकीने धडक दिल्यानंतर हा तरुण रस्त्यावरच जोरात आदळला. हा संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघात जखमी झालेल्या युवकाचे नाव समाधान खरात आहे. आता या युवकावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
COMMENTS