सोलापूर प्रतिनिधी - सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत शोभेचे दारूकाम सोहळा उत्साहात पार पडला... दोन वर्षानंतर पहिल्यांदा शोभेचे दारू क

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत शोभेचे दारूकाम सोहळा उत्साहात पार पडला… दोन वर्षानंतर पहिल्यांदा शोभेचे दारू काम पार पडत असल्याने मोठा उत्साह पाहायला मिळाला.. कोरोना काळात केवळ धार्मिक विधींना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शोभेचे दारू काम सोहळा झालेला नव्हता.. दोन वर्षानी डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा होतं असल्याने प्रत्येक जन आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण टिपून ठेवण्यासाठी आतुर होते. यंदा पहिल्यांदाच या सोहळ्यात ‘लेजर शो’ चे देखील आयोजन करण्यात आले होते. कर्मयोगी सिद्धेश्वर या लेजर शोच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वर महाराजांचे कार्य मांडण्यात आलं. त्याचप्रमाणे सिद्धरामेश्वर यांच्या जत्रेत ‘गड्डा यात्रा’ भरली आहे. उंच उंच पाळणे, ब्रेक डान्स, टोराटोरा, मौत कां कुआ अशा विविध मनोरंजक खेळामुळे यात्रा सजली आहे. ड्रोन पायलट परमेश्वर पाटील यांनी गड्डा यात्रा आणि शोभेचे दारूकाम आकाशातून कसं दिसतात हे टिपलय
COMMENTS