जालना प्रतिनिधी - सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बिळात पा
जालना प्रतिनिधी – सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बिळात पाणी गेल्याने सापांचा मुक्त संचार देखील वाढला आहे. अशातच जालना(Jalna) जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्याने दावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र दावणीला बांधलेला बैल जराही या नागाला न घाबरता मोठ्या तोऱ्यात टाईट उभा राहिला. जालना जिल्ह्यातील अंबड(Ambad) तालुक्यातील लोणार भायगाव(Lonar Bhaigaon) येथे ही घटना घडलीय. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली. शेतकरी सोनाजी जाधव(Sonaji Jadhav) यांच्या शेतात हि घटना घडली आहे. अखेरीस नागाने माघार घेत तेथून धूम ठोकली आणि उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी बैलाचे कौतुक करत सुटकेचा निश्वास टाकला.
COMMENTS