Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड शहरातील ईमामपुर रस्त्या लगत राहुल नगर रस्त्यावरच थाटले दुकान..

अतिक्रमण न काढल्यास उपोषणास बसणार-सुनील महांकुंडे

बीड प्रतिनिधी - बीड शहारत न.प.हद्दी मध्ये बांधकाम मोठया प्रमाणात वाढ झाली असून त्यातील बरेच बांधकाम हें अनधिकृत असून त्याकडे न.प.मुख्यधिकारि याचे

झारखंड सभागृहातील गूंज !
राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता
गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक

बीड प्रतिनिधी – बीड शहारत न.प.हद्दी मध्ये बांधकाम मोठया प्रमाणात वाढ झाली असून त्यातील बरेच बांधकाम हें अनधिकृत असून त्याकडे न.प.मुख्यधिकारि याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.सुरु असलेले बांधकाम करणार्‍याकडे परवाना देखील घेतला जात नसून मुख्यधिकारी यांनच्या दुर्लक्षने शहारत एकही कारवाई न झाल्याने बिनधास्त मनमानी सुरु आहे. बीड शहरातील बार्शी नाका, ईमामपूर रस्त्यावर,राहुल नगर लगत एकाने अतिक्रमण करून रस्त्यावर आर.सी.सी.दुकान बांधकाम केले असून त्यामुळे वाहतूक व ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे.सदर रस्ता खुला करून याची बांधकाम परवानगी आहे का,कर भरला आहे का याची चौकशी करून हें अतिक्रमण काढून टाकबाबत तक्रार अर्ज स्थानिक रहिवाशी व माजी सभापती न.प.सुनील महाकुंडे यांनी केला आहे.  
वरील विषयी अर्ज सादर केला आहे की,उमेश भारत ढोले. या व्यक्तीने 90 वर्षा पासुनच्या रस्त्यावर आर.सी.सी.बांधकाम केलेले आहे.सदर बांधकाम केलेल्या नालीचे चेंबर खाली सिमेंटचा रस्ता आहे व बाजुच्या राहणान्या नंदाबाई मुळे यांच्या समोरील घराचा रस्ता 10 फुट रजिस्ट्री खरेदीखतामध्ये दिलेला आहे. त्यावर सुद्धा तेथुन सदर रस्त्यावरून तेथील नागरीकांना जाता येत नाही. सदरील दुकान हे पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर बांधले आहे.सदरील जागेचा बांधकाम कार्यालय नगर परिषद, बीड.   परवानगी- ले आऊट, पो. आर. कार्ड, 7/12 इत्यादी तपासून त्या रस्त्यावर बांधकाम केलेल्या व्यक्तीवर कार्यवाही करून सदर बांधकाम पाडून हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात यावा असे न झाल्यास आम्ही रहिवाशी व खालील सहया करणारे नागरीक न.प.समोर  आंदोलन करणार आहोत. तसेच सदरील रस्ता खुला करून दिला नाही तर, दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहोत, ज्याच्या होणान्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही न.प.कार्यलय व मुख्यधिकारी तसेच त्यास नगर परिषद व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी. या अगोदर मा. मुख्याधिकारी नगर परिषद, बीड यांना तक्रारी अर्ज देवून सुध्दा कसल्याही प्रकारची कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. तरी मा.साहेबांनी उपरोक्त बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी.व ज्या व्यक्तीने आर.सी.सी. बांधकाम अतिक्रमण केलेले आहे, त्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी यासाठी तक्रार अर्ज केला असून तात्काळ यावर कारवाई करून अतिक्रमण काढून टाकत रहिवाश्यासाठी रस्ता खुला करावा अशी मागणी सुनील महाकुंडे यांनी केली आहे.

COMMENTS