Homeताज्या बातम्यादेश

सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा आला समोर

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सतीश कौशिक यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे दिल्ली पोलि

प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात हरघर तिरंगा घरघर तिरंगा उपक्रम साजरा
सरपंच सौ. रेशमा गंभीरे महात्मा फुले समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
रघुराम राजन : भांडवलदारांचे हस्तक अर्थतज्ज्ञ !

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सतीश कौशिक यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पोलीस आता या प्रकरणी सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत.

होळीचा सण साजरा करण्यासाठी सतीश कौशिक दिल्लीहून मुंबईत आले होते. येथील एका फार्म हाऊसवर त्यांनी होळी पार्टीला हजेरी लावली. दिल्ली पोलिसांच्या टीमने फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली असता पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आता पार्टीला आलेल्या पाहुण्यांची यादीही तयार करत आहेत. गरज पडल्यास पोलीस या लोकांची चौकशीही करू शकतात. सतीश कौशिक यांचे गुरुवारी निधन झाले हे विशेष. प्राथमिक तपासणीच्या आधारे, अभिनेत्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS