Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात भरधाव कार रसवंतीगृहात घुसून एका शाळकरी मुलाचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी - पलूस तालुक्यात एक भरधाव कार रसवंतीगृहात घुसून भीषण अपघात झाला. खंडोबाचीवाडी इथे झालेल्या या अपघातात एका अकरा वर्षीय शाळकरी

आमदारांच्या चालकांसाठी विशेष कार्यशाळा
अपघातात तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले स्कॉर्पियो थेट संरक्षक पट्टीला जाऊ धडकली.

सांगली प्रतिनिधी – पलूस तालुक्यात एक भरधाव कार रसवंतीगृहात घुसून भीषण अपघात झाला. खंडोबाचीवाडी इथे झालेल्या या अपघातात एका अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. समर्थ शिंदे असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. खंडोबाचीवाडी इथे एका पेट्रोल पंपाशेजारी रसवंतीगृह आहे. या रसवंतीगृहात वडिलांसोबत समर्थ बसला होता. तेव्हा अचानक भरधाव कार रसवंतीगृहात घुसली. यामुळे रसवंतीगृहाचे पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. तर चाकाखाली समर्थ चिरडला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कार भिलवडी स्टेशनवरून तासगावच्या दिशेने जात होती. भरधाव वेगाने जाणारी एम एच १० सी एक्स ४०८१ मारुती सुझुकी सियाज चार चाकी गाडी रसवंती गृहात घुसली. पेट्रोल पंपाच्या समोर, रस्त्याकडेला असणाऱ्या रसवंती गृहामध्ये भरधाव वेगाने येऊन शिरली. यावेळी संतोष गोपाळ शिंदे, जयश्री संतोष शिंदे व त्यांचा मुलगा समर्थ हे या रसवंतीगृहामध्ये होते. गाडीचा वेग इतका होता की, गाडी रसवंतीगृहाच्या पत्र्याच्या शेडला धडकताच शेड उखडले गेले. या धडकेमध्ये रसवंती चालक संतोष गोपाळ शिंदे यांचा मुलगा समर्थ संतोष शिंदे याच्या अंगावरून गाडी गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई जयश्री शिंदे या जखमी झाल्या आहेत.

COMMENTS