Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आ.संजय गायकवाड आले धावून

बुलडाणा प्रतिनिधी- 11 डिसेंबर रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हा

देशभरात नव वर्षाच्या स्वागताचा उत्साह
विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर शरण | LOKNews24
अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

बुलडाणा प्रतिनिधी– 11 डिसेंबर रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जणू या महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू झाले आहे.. रात्री  बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड नागपूर अधिवेशनासाठी समृद्धी महामार्गाने जात असताना वर्धा-नागपूरच्या दरम्यान त्यांच्या वाहनाला काही लोकांनी हात दिला असता आमदार गायकवाड यांचे लक्षात आले की समोरचे लोक मदत मागत आहे.म्हणून त्यांनी आपले वाहन थांबून पाहिले असता मदत मागणाऱ्यांच्या वाहनासमोर नीलगाय आडवी आल्याने त्यांच्या कारचा अपघात झाला होता. अपघातग्रस्त कार मध्ये प्रदेशातून परत आलेला जकाते परिवारातील काहीजण जखमी होते.त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील डॉ. निलेश खरात हे आपली कारने नागपूरकडे जात असताना त्यांनी आमदार गायकवाड यांची गाडी पाहून ते सुद्धा थांबले.आमदार गायकवाड यांनी तात्काळ डॉ.खरात यांच्या गाडीत जखमींना उपचारासाठी नागपूरकडे रवाना केले.अपघातानंतर जकाते परिवाराने अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु मदतीसाठी कोणीच थांबलं नव्हते.शेवटी आ.गायकवाड त्यांच्या मदतीसाठी धावून आले..या अपघातात निलगायचा मृत्यू झाला.

COMMENTS