Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात मृत्यू; नगर-कल्याण महामार्गावर तीन तास रास्तारोको

कायदा हातात घेऊन वाळूचे डंपर पेटवू ; संतप्त नागरिकांचा इशारा पारनेर : तालुक्यातील रस्ते अपघातत बोकनवाडीत तरुणाच्या झालेल्या मृत्युमुळे संतप्त झाले

एमआयडीसी जवळ झालेल्या अपघातात अनोळखी वृध्दाचा मृत्यू
डीजेचं सामान घ्यायला गेले, पण घरी परतलेच नाहीत!
समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे जखमी

कायदा हातात घेऊन वाळूचे डंपर पेटवू ; संतप्त नागरिकांचा इशारा

पारनेर : तालुक्यातील रस्ते अपघातत बोकनवाडीत तरुणाच्या झालेल्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत मंगळवारी (दि.६ जानेवारी) सकाळी १० वाजल्यापासून टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन छेडले. शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन नगर कल्याण महामार्गावर सलग तीन तास सुरू होते. आंदोलकांनी थेट पारनेर तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी करत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका केली.

 पारनेर तालुक्यातील मांडओहळ परिसरातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीमुळे पुन्हा एकदा निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे.  रविवार  ४ जानेवारी रोजी सकाळी सुमारे सात वाजता मांडओहळ नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव डंपरने बोकनकवाडी ते वासुंदे रोडवर दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संतोष नर्‍हे (वय ३२, रा. बोकनकवाडी, ता. पारनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि परिसरात हळहळ व्यक्त झाली.

 मांडओहळ परिसरात गेल्या काही वर्षांपासून अवैध वाळू उत्खनन आणि भरधाव डंपरांची बेधडक वाहतूक सुरू आहे. यामुळे वारंवार अपघात घडत असूनही महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या अवैध धंद्यात वाळू माफियांचा समावेश असून त्यांना प्रशासकीय पाठबळ मिळत असल्याची भावना परिसरात आहे.

  संतोष नर्‍हे यांचा मृत्यू हा अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेला खून असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अनेक मागण्या जोरदारपणे मांडल्या. मांडओहळ परिसरातील अवैध वाळू उत्खनन तात्काळ बंद करावे, वाळू माफियांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अपघातातील डंपर चालक आणि मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, तसेच महसूल आणि पोलीस विभागाने समन्वय साधून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच हे बंद झाले नाही तर कायदा हातात घेऊन वाळूचे डंपर पेटवू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

COMMENTS