Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात डेंग्यू संदर्भात आढावा बैठक संपन्न

नाशिक - नाशिक शहरातील वाढते डेंग्यूचे रुग्ण याबाबत आज पालकमंत्री मा. ना. दादाजी भुसे साहेब यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील कॅफे मालकाला अटक
आठ महिन्यात सायबरचे 1114 गुन्हे दाखल , पुणेकरांना 20 कोटींचा गंडा
मढीत मानाची होळी पेटवत कानिफनाथ यात्रेला सुरूवात

नाशिक – नाशिक शहरातील वाढते डेंग्यूचे रुग्ण याबाबत आज पालकमंत्री मा. ना. दादाजी भुसे साहेब यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरीही डेंग्यूचे रुग्ण वाढले तसेच नाशिक शहराचा देखील आढावा घेतला.* आतापर्यंत 1721 प्राथमिक टेस्ट करण्यात आल्या तर 474 डेंग्यू टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आल्यात. यात खाजगी आणि शासकीय दवाखान्यात रुग्ण आहेत. येणाऱ्या काळात स्पेशल ड्राईव्ह राबविण्याच्या पालकमंत्री म्हणून भुसे साहेबांनी सूचना केल्या आहेत.

1200 पेक्षा अधिक किट उपलब्ध होते. आणखी 400 किट उपलब्ध आहेत. काही दिवस किट नव्हते ही वस्तुस्थिती आहे. नाशिक मनपा आणि मालेगाव मनपा साठी डेंग्यू लॅब टेस्टचा प्रस्ताव पाठवत आहोत, यातून कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा विचार असून डेंग्यू डास आणि मच्छर ज्यामुळे होतो त्यावर उपाययोजना सुरू आहेत. पाणी साठे राहणार नाही उत्पत्ती होणार नाही यासाठी सूचना केली आहे. आवश्यकता भासल्यास शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर उपलब्ध केले जातील. अळ्या तयार होतात, डीबेलीन गोळ्या असतात त्या फ्रिज जवळ ठेवल्या तर तयार होत नाही.

संदर्भ रुग्णालयात जवळपास 1800 बायपास झाले, कॅथ लॅब जुने आहे ही वस्तुस्थिती डॉक्टर जे ऑपरेट करतात नवीन मशीनला 15 मिनिटे लागतात जुन्या मशीनला 30 मिनिटे लागतात. किडनी ट्रान्सप्लांट मशीन बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2018 पासून हे काम सुरू असून 15 ऑगस्ट पर्यंत सुरू करण्याच्या सूचना केल्यात, 105 बेड चे काम सुरू आहे, 5 ते 10 टक्के काम बाकी महिनाभरात ते काम देखील पूर्ण होईल.

COMMENTS