Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला भररस्त्यात संपवलं

औरंगाबाद प्रतिनिधी - आपल्या बहिणीसोबत पळून जाऊन  विवाह केल्याचा राग मनात धरून नवऱ्यावर भर रस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून केल्य

परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या !
चित्रपट पाहून सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या
 डोंबिवलीत प्रियकरांनी केली प्रेयसीची हत्या

औरंगाबाद प्रतिनिधी – आपल्या बहिणीसोबत पळून जाऊन  विवाह केल्याचा राग मनात धरून नवऱ्यावर भर रस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर दहेगाव बंगला येथे घडली. बापू छबू खिल्लारे (३४) असे मृताचे नाव आहे. दिवसा ढवळ्या महामार्गावर घडलेल्या खुनाच्या ‘ सैराट ‘ घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी वाळूज पोलिसांनी दोनच तासातच सचिन श्यामराव नाटकर (२४) रा.भोकर ता.श्रीरामपूर या आरोपी ‘ प्रिन्स ‘ च्या मुसक्या आवळल्या. याविषयी अधिक माहिती अशी की मृत बापू खिल्लारे याने आरोपी सचिन नाटकर याच्या बहिणीसोबत काही वर्षा पूर्वी पळून जाऊन आंतरजातीय प्रेम विवाह केला होता;

विवाहनंतर त्यां दोघांना एक मुलगा झाला मात्र काही महिन्यातच तो आजारपणाने मृत झाला यादरम्यान मृत बापूचे आपल्या पत्नी सोबत बिनसले तेव्हा पासून ती आपल्या पती पासून वेगळी राहत होती; तर बापू आपल्या भावासोबत त्याच्या सासरवडीला सांरगपुर ता.गंगापूर येथे मागील दोन महिन्यांपासून राहून हुरडा विकण्याचा व्यवसाय करीत होता. बापू मुळेच आपल्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले हा राग मनात ठेवून आरोपी सचिनने बापूला गाठले व कुऱ्हाडीचा घाव घालून संपविले. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी अवघ्या दोनच तासात गतीने चक्र फिरवून आरोपीला नेवासा परिसरातून ताब्यात घेतले; त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड कोठे टाकली याचा शोध वाळूज पोलिस रात्री उशिरा पर्यंत घेत आहे अशी माहिती पोनि सचिन इंगोले यांनी दिली.

COMMENTS