पाथर्डी प्रतिनिधी - पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध करून देऊन गावाच्या आसपास तांडे,वाडीवस्

पाथर्डी प्रतिनिधी – पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध करून देऊन गावाच्या आसपास तांडे,वाडीवस्ती वरील रुग्णांची रात्रीच्या वैद्यकीय सेवेचे होणारी गैरसोय टाळावी यासाठी पाथर्डी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आरोग्य विभागाला निवेदन देण्यात आले.तसेच मागणी मान्य न झाल्यास येत्या ३० जानेवारी रोजी माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नासिर शहानवाज शेख प्रा.काटे जालिंदर इजाज पठाण,वसंतराव खेडकर,रोहिदास खेडकर,सुभाष कोलते,अब्दुल अजीज शेख,आकाश काळोखे,युसुफ खान,गणेश दिनकर आदी जण उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी सतत डॉक्टर उपलब्ध नसल्याने तेथील रुग्णांना वैद्यकीय सेवा तात्काळ मिळत नाही.ही अत्यंत गंभीर बाब असून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.सदरील प्रकार प्रशासनाच्या कित्येक वेळा लक्षात आणून दिला तरी अजूनही परिस्थिती जैसे तैसेच आहे.रात्रीच्या वेळी नियमित डॉक्टर उपलब्ध राहण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.परंतू अद्याप त्यावर प्रशासनाकडून कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.सदर परिस्थिती अशीच राहिली तर येत्या ३० जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल.
COMMENTS