Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणावळ्यात विक्रमी 370 मिलिमीटर पावसाची नोंद

पुणे ः जिल्ह्यातील लोणावळा शहरामध्ये राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. लोणावळा शहरात 24 तासांमध्ये विक्रमी 370 मिलिमीटर पावसाची नो

वैश्‍विक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा विद्यार्थी रयतमध्ये घडावा : आ. दिलीप वळसे-पाटील
दसर्‍याला चौंडीत धनगर आरक्षणासाठी महामेळावा
जम्मू काश्मीरमध्ये 14 व्या दिवशीही चकमक सुरूच ; 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू

पुणे ः जिल्ह्यातील लोणावळा शहरामध्ये राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. लोणावळा शहरात 24 तासांमध्ये विक्रमी 370 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.  बुधवारी दिवसभर 145 मिलिमीटर, तर रात्रीच्या सुमारास 225 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे व त्या स्वरूपाचा पाऊस देखील लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये मागील 24 तासांपासून सुरू आहे. गुरवारी देखील पावसाचा जोर कायम राहिला आहे. लोणावळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
18 जुलैपासून लोणावळा शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर मागील 48 तासांपासून पावसाने लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे लोणावळा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून पवना धरणांमध्ये 68 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाणेमावळातील वडिवळे धरण हे पूर्ण भरले असून धरणांमधून 7000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सर्वच ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील सर्व शाळांना 25 जुलै रोजी विशेष सुटी जाहीर करण्यात आली असून लोणावळा नगरपरिषद हाती मधील शाळांना 25 व 26 जुलै रोजी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने व शिक्षण मंडळाच्या वतीने विशेष सुटी जाहीर करण्यात आली आहे.

COMMENTS