Homeताज्या बातम्यादेश

चालकाविना रेल्वे मालगाडी धावली 84 किलोमीटर

जम्मू-काश्मीरमधील घटना ; रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

श्रीनगर: चालकाविना रेल्वे मालगाडी धावण्याचा गंभीर आणि धोकादायक प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. रविवा

चित्रपटगृहे, नाट्यगृहांच्या रंगभूमी करात वाढ
23 वर्षांच्या तरुणाचा किक बॉक्सिंग सामन्यादरम्यान मृत्यू !
सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

श्रीनगर: चालकाविना रेल्वे मालगाडी धावण्याचा गंभीर आणि धोकादायक प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. रविवारी जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने अचानक धावू लागली. मात्र या मालगाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता. उतारामुळे ही मालगाडी ड्रायव्हरशिवाय धावत गेल्याची माहिती आहे. ही मालगाडी जवळपास 84 किलोमीटरपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय धावत राहिली. यामुळे रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली.

खूप प्रयत्नांनंतर मालगाडी पंजाबच्या मुकेरियनमधील उन्ची बस्सीजवळ थांबवण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे जम्मूचे विभागीय वाहतूक व्यवस्थापक यांनी सांगितले आहे. ही घटना रविवारी सकाळी 7.10 च्या सुमारास घडली. चालकाने कठुआ, जम्मू येथे मालगाडी क्रमांक 14806 आर थांबवली होती. त्यानंतर चालक गाडीमधून खाली उतरून चहा प्यायला गेला. मात्र, काही वेळाने मालगाडी अचानक धावली आणि काहीच क्षणात मालगाडीचा वेग वाढला. कठुआ रेल्वे स्थानकाजवळील सूत्रांनी सांगितले की, मालगाडी काँक्रीट वाहून नेत होती. हे काँक्रीट कठुआ येथून मालगाडीत भरण्यात आले. चालक आणि सहचालक चहासाठी थांबले, तेव्हा इंजिन चालूच होते. यामुळे मालगाडी अचानक सुरू झाली. गाडीतून उतरण्यापूर्वी ड्रायव्हरने हँडब्रेक ओढला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चालकाने गाडी सुरू झाल्याचे पाहिले आणि त्याला शॉकच बसला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. यानंतर रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक प्रयत्न अयशस्वी झाले. यानंतर दसुहाजवळील उची बस्ती परिसरात पॅसेंजर गाड्यांचे चालक आणि कर्मचार्‍यांनी गाडी अडवली. तोपर्यंत मालगाडी 84 किलोमीटरपर्यंत धावली होती.

COMMENTS