Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भांबोर्‍यातील जुगार अड्ड्यावर छापा

6 जणांविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील स्मशानभूमीजवळ अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून कर्जत पोलिसांनी कारवाई केलीे. रविवारी,दि.20 ऑगस

राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा समाजभूषण, कर्तव्यसंपन्न ‘लेकीचा’ सन्मान सोहळा संपन्न
कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी पालिका कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन
भाजपच्या नव्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सत्कार

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील स्मशानभूमीजवळ अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून कर्जत पोलिसांनी कारवाई केलीे. रविवारी,दि.20 ऑगस्ट रोजी भांबोरा येथील स्मशानभूमीच्या शेजारील झाडाच्या आडोशाला काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,त्यांच्या कडील जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये अनंत सयाजी शेटे, (वय : 50, वर्षे,)  दादासाहेब बाळु हिरभगत, (वय : 30 वर्षे,)  दस्तगीर इस्माईल सय्यद, (वय : 57 वर्षे,)  दिगंबर बापुराव जगताप, (वय : 41 वर्षे,)  मधुकर किसन रंधवे, (वय : 51 वर्षे), (सर्व रा. भांबोरा)  व काशीनाथ बाबा जाधव, (वय : 45 वर्षे, रा. वडारवस्ती, सिद्धटेक)  हे तळवटावर बसून तिर्रट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 3,690 /-रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल नितीन धस यांनी 6 जणांविरुद्ध मुंबई जुगार अधिनियम 12 (अ) प्रमाणे फिर्याद दिली.उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राशीन पोलिस उपकेंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस नाईक संभाजी वाबळे, पोलिस कॉन्स्टेबल नितीन धस यांनी ही कारवाई केली.

COMMENTS