कराड / प्रतिनिधी : कराड नगरपालिकेत मेहेरबानांचे राज्य असताना अनेकदा टक्केवारीवरून आरोप-प्रत्यारोप झालेले पहायला मिळातात. कामाचा दर्जाबाबत वारंवार
कराड / प्रतिनिधी : कराड नगरपालिकेत मेहेरबानांचे राज्य असताना अनेकदा टक्केवारीवरून आरोप-प्रत्यारोप झालेले पहायला मिळातात. कामाचा दर्जाबाबत वारंवार चर्चा होत असतात. मात्र, आता प्रशासक आल्यानंतर अधिकार्यांची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे. चक्क मुख्याधिकार्यांनी कामाबाबत केलेले जवळपास 50 फोन उचलले जात नाहीत. तेंव्हा ए. आर. पवार म्हणजे कोण रं भाऊ असे म्हणण्याची वेळ आता कराडकरांसह मुख्याधिकार्यांवर आली आहे.
कराड शहरातील रूक्मिणीनगर परिसरात एका ठिकाणी चेंबरचे बांधकाम करण्यात आले. कराड नगरपालिकच्या ठेकेदाराने काही तासात हे काम उरकून घेतले आहे. या कामावर पाणी मारणे, त्यांचा दर्जा यांचा काहीही संबध दिसून आला नाही. ठेकेदाराने आपले काम दर्जात्मक न करता उरकते घेतले. तरी नगरपालिकेचे अधिकारी झोपेत असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी विचारणा करण्यासाठी ए. आर. पवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उचलला नाही. तेंव्हा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कानावर हा विषय संबधितांनी घातला. मुख्याधिकार्यांनी ए. आर. पवार यांना जवळपास 50 फोन केले. परंतू ते उचलले नसल्याचे खुद्द मुख्याधिकार्यांनी संबधितांना सांगितले.
ठेकेदारांची कमाल! तीन तासांत चेंबर बांधून तयार
शनिवार, दि. 28 मे रोजी काल दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान नगरपालिकेचे एक ठेकेदाराने रूक्मिणीनगर येथे एका चेंबरचे काम केले. बरेच दिवस चेंबरचे काम झाले नव्हते. रस्ता तयार झाल्यानंतर चेंबरसाठी रस्ता उकरला. केवळ 3 तासात 5 ते साडेपाच फूटाचे चेंबर तयार केला. बांधकामांच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने हे काम झाले आहे. केवळ 4 तासात पैसे लुटण्याचे काम ठेकेदारांकडून सुरू आहे. तेथे कोणताही नगरपालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे.
याबाबत नगरपालिकेचे अधिकारी ए. आर. पवार यांना फोन केला. व्हॉटसअपला फोटो पाठवले परंतू रविवारी सायंकाळपर्यंत त्याबाबत कोणताही रिप्लाय किंवा प्रतिसाद नाही. त्यानंतर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनाही शनिवारी यांची कल्पना दिली. परंतू कालपासून मुख्याधिकार्यांनी 50 पेक्षा अधिक फोन ए. आर. पवार यांना केले. तरी फोन उचलले नसल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले. अधिकारी मुख्याधिकार्यांचा ऐकत नाही. तेंव्हा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी सांगितले.
COMMENTS