Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डांबरीकरणासाठी आलेली सव्वा लाखाची खडी लंपास

अहमदनगर/प्रतिनिधी ः रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेली खडीच चक्क गायब झाली. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून, प

अवैध व्यवसायाविरोधात सुरू केलेल उपोषण आश्‍वासनानंतर स्थगित
सामाजिक बांधिलकी जपणारे जादूगार हांडे फाउंडेशन – कुलकर्णी
भक्तांच्या रक्षणार्थ नृसिंह महाराजांचा अवतार ः सुराशे महाराज

अहमदनगर/प्रतिनिधी ः रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी रस्त्याच्या कडेला टाकलेली खडीच चक्क गायब झाली. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, केडगाव उपनगरातील बिरोबा मंदिर ते अरणगाव रोडवरून एक लाख 20 हजार रुपये किमतीची 48 ब्रास खडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. 12 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 13 मार्च सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी 15 मार्च रोजी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव विजय पुरी (वय 30 रा. कोळगाव ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ठेकेदार असून ते रस्त्याची कामे घेतात. त्यांनी केडगाव उपनगरातील रस्ता कामासाठी बिरोबा मंदिर ते अरणगाव रोडवरील मोकळ्या जागेत 10 एमएम साईजची 24 ब्रास व 40 एमएमची 24 ब्रास अशी एक लाख 20 हजार रुपये किमतीची 48 ब्रास खडी टाकून ठेवली होती. ती खडी अज्ञाताने चोरून नेली आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातचा तपास पोलिस अंमलदार योगेश कवाष्टे करीत आहेत.

COMMENTS