लातूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्या निषेधार्थ शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील रेण
लातूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्या निषेधार्थ शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असे या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून अशातच संतोष देशमुख यांची कन्या ही देखील या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे. या मोर्च्याच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आला आहे. यात मुख्यत्वे सात मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुख्य आरोपींसह कटाचा सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, सदरचे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी.सदरील संतोष देशमुख यांच्या पिडीत कुटूंबियांना व दहशती खाली असणार्या मस्साजोग येथील ग्रामस्थांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. संतोष देशमुख यांच्या कुटूंबियातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समावून घेण्यात यावे. सदरील खून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मुंडे कुटुंबाकडे असलेल्या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा. सदरील घटनेचा गुन्हा नोंद करुन घेण्यास टाळाटाळ करून व विलंब करुन आरोपीस मदत करणार्या पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करुन, त्यांना या खुनामध्येसह आरोपी करण्यात यावे, परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणार्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
COMMENTS