धुळे प्रतिनिधी - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरातील बापूसाहेब ग.द. माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय आणि तू.ता. खल
धुळे प्रतिनिधी – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरातील बापूसाहेब ग.द. माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय आणि तू.ता. खलाणे महाजन हायस्कूल यांच्या वतीने शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्ण सहभाग नोंदवला यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा यावेळी साकारल्या होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केला जातो. या निमित्त धुळे शहरातील महाजन हायस्कूल आणि ग.द माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. धुळे शहरातील देवपूरात असलेल्या महाजन हायस्कूल पासून ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्यापर्यंत निघालेल्या या शोभायात्रेत विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. शोभायात्रेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण धुळेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच ढोल पथक, लेझीम पथक, आदिवासी नृत्य, एनसीसी पथक तसेच महापुरुषांचे देखावे असलेल्या या शोभायात्रेत संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला माल्या अर्पण करून या शोभात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्राचार्य विजय पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुढे नेण्यासाठी व त्यांचा इतिहास लोकांना अधिकाधिक माहीत व्हावा यासाठी दरवर्षी 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात येते. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
COMMENTS