Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यात आज यशवंतराव होळकरांच्या पुतळयाची मिरवणूक

शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता शहरात मंगळवार 9 मे रोजी सकाळी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे शहरात आगमन होणार आहे या निमित्त शहराती

Ahmednagar : पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल | LOKNews24
भाजपा आमदार राम सातपूते यांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरात भव्य रँली
नुकसानग्रस्त भागांची कृषीमंत्री सत्तारांनी केली पाहणी

शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता शहरात मंगळवार 9 मे रोजी सकाळी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे शहरात आगमन होणार आहे या निमित्त शहरातील ग्रामस्थांनी त्यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्याकरिता मोठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
मिरवणूकीत उंट, घोडे या बरोबर सनई, डफ, राजमाता अहिल्यादेवी होळकर व महाराजा यशवंत होळकर यांचे जिवंत देखावे फुलांची पुष्पवृष्टी करण्यात येणार असून राहाता बस स्टॅन्ड पासून ते वीरभद्र मंदिरापर्यंत शहरातील हजारो नागरिक या मिरवणुकीत सामील होणार आहे . वीरभद्र मंदिरासमोर मेंढ्यांचा  रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर खंडोबा देवतेच्या महारती नंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. इंग्रजांना भारताबाहेर काढण्यासाठी पहिले महायुद्ध पुकारणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजा नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे एकाही युद्धात पराभव न पाहिलेले होळकर साम्राज्याचे पहिले चक्रवर्ती महाराज यशवंत होळकर यांचा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी त्यांच्या भव्य 14 फुट उंचीच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे पुणे शहरातून शौर्य यात्रेच्या माध्यमातून वाजत गाजत सुरुवात होणार असून यात होळकर यांचे वंशज देखील सामिल   होणार आहे. 13 मे रोजी इंदोर येथे हा पुतळा साकारला जाणार आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता राहाता येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्य यात्रेची मोठ्या उत्साहात तयारी करण्यासाठी  बाळासाहेब राऊत, सर्जेराव भगत ,साहेबराव निधाने, मुन्ना सदाफळ, गणेश नजन, डॉ स्वाधीन गाडेकर, राजेंद्र गायकवाड, निखिल वाबळे ,विजय बोरकर, गणेश बोरकर, संजय भाकरे ,बाळासाहेब गिधाड, संदीप गायकवाड, विशाल गायकवाड, योगेश गायकवाड, मनीष चितळकर, मारुतीराव गिधाड, वसंतराव गायकवाड ,जयसिंग सातव, आबा मेचे, चांगदेव गिधाड, रंगनाथ गिधाड, निलेश गिधाड, विशाल मखाना ,गणेश गिधाड, संतोष गिधाड, भाऊसाहेब गिधाड, अजय गिधाड, विनय गिधाड ,रोहित   गायकवाड ,सुदाम सुलाखे ,अनिल गिधाड ,नाना गिधाड, आबा गायकवाड ,ऋषी धुम्से, सोमनाथ भगत, सागर बोठे, राजेंद्र धुमसे, साई सदाफळ, अनिल  बोठे,  प्रवीण सदाफळ, प्रताप सावंत, तुषार सदाफळ, आबा गायकवाड ,सचिन बोठे, अरविंद गाडेकर ,विजय गायकवाड, अनिल गायकवाड, अभिजीत गायकवाड ,प्रशांत गायकवाड, विशाल बोठे, प्रसाद बोठे, विनीत सदाफळ, सागर सदाफळ, संतोष बोरकर, पप्पू  शेळके, हेमंत दंडवते, बबलू कारले, नवनाथ सदाफळ, रामनाथ सदाफळ, भीमा  निकाळे, निवृत्ती बनकर , कृष्णा धुंमसे ,भाऊसाहेब धुमसे, यांच्यासह आदी ग्रामस्थ  प्रयत्नशील आहेत.

COMMENTS