Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारणा नदीच्या पुलावरून खासगी बस कोसळली

कोल्हापूर: गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुम

जम्मू-कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भीषण अपघात
देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या पाच जणांचा भयावह मृत्यू
शिरुर-हाळी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोघे ठार

कोल्हापूर: गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात असलेल्या वारणा नदीवरील कोकरूड कोणावर घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून बसचे किरकोळ नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारणा नदीवरील कोकरूड पुलावरून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे वाया कराड मार्गे पोलो या खाजगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. काल पाऊस पडल्याने रस्ता निसरडा झाला होता. शिवाय आज या परिसरात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने समोरचे स्पष्ट देखील दिसत नव्हते. सकाळी आठ वाजता ही बस प्रवाशांना घेऊन या पुलावरून जात असताना अचानक चालकाचा बस वरील ताबा सुटला आणि बस थेट वारणा नदीच्या पात्रात कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने नदीला पाणी कमी असल्याने ही बस नदीपत्रात कोरड्या भागात जाऊन थांबली. यावेळी बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडले. दरम्यान, ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ जखमींना उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे. तर बसचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे.

COMMENTS