गडचिरोली : बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजय असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगला होता. हायहोल्टेज लढत म्हणून या लढतीकडे बघितले जात होते. मात्र विधानसभ
गडचिरोली : बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजय असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगला होता. हायहोल्टेज लढत म्हणून या लढतीकडे बघितले जात होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत देखील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात जन्मदात्या वडिलांनाच मुलगी राजकीय आव्हान देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात त्यांच्या कन्या भाग्यश्री यांनी दंड थोपटले असून त्या लवकरच म्हणजे 12 किंवा 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्याच मोठ्या मुलीने आव्हान दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या वादाची ठिणगी पडल्याची माहिती आहे. आत्राम यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती. पण ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पु्न्हा विधानसभेवर लक्ष केंद्रित केले. पण यावेळी त्यांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम व जावई ऋतुराज हलगेकर हेदेखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या कुटुंबात सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. परिणामी, आता आत्राम यांच्या नेतृत्वात लहानाची मोठी झालेली मुलगी व जावईच त्यांना आव्हान देत आहेत. मंत्री आत्राम यांनी 6 सप्टेंबर रोजी जनसन्मान यात्रेच्या भाषणावेळी आपल्या मनातील खदखद जनतेपुढे बोलून दाखवली. त्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात बाप-लेकीतील या संभाव्य राजकीय संघर्षाची चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा, बांधकाम सभापतीसह विविध राजकीय पद भूषवलेल्या भाग्यश्री आत्राम या मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या.
COMMENTS