मुंबई/प्रतिनिधी : कफ परेड येथे पोलिस उपनिरीक्षकावर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपीविरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची मान

मुंबई/प्रतिनिधी : कफ परेड येथे पोलिस उपनिरीक्षकावर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपीविरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत कफ परेड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपी गुलाम मुस्तफा शेख वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक गेले असता आरोपी शेखने ब्लेड काढले. जवळ आल्यास मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर शेखने भागवत यांच्या दिशेने ब्लेड फिरवण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने ब्लेडने हल्ला केला. त्यात भागवत यांच्या हाताला तीन ते चार जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी आरोपी शेखला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात यापूर्वी हत्या, पोलिसांवर हल्ला व अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपीची मानसिक स्थिती ठीक वाटत नसून त्याला उपचारासाठी ठाणे येथील मध्यवर्ती मनोरुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
COMMENTS