Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप

पुणे ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभेत पुन्हा हिंदुत्वाचा हुंकार दिला. यावेळी त्यांनी मशिदीवर

परिवारातील नाते भावनांच्या धाग्याने बांधले तर कधीच तुटणार नाहीत – प.पू.डॉ.गौरवमुनी
गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात अनियमितता
Mumbai : यूट्यूबवरून प्रशिक्षण घेत चोरी| LOKNews24

पुणे ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभेत पुन्हा हिंदुत्वाचा हुंकार दिला. यावेळी त्यांनी मशिदीवरी भोंगे बंद करण्याचा इशारा दिला. तसेच, सांगली, माहीम येथील अनधिकृत मशीद, दर्ग्यांवरही कारवाईची मागणी केली. मात्र, राज ठाकरेंच्या या भाषणाविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे
पुण्यातील वाकड पोलिस ठाण्यामध्ये राज ठाकरेंविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीत राज ठाकरे यांचे प्रक्षोभक असून त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाजीद रजाक सय्यद यांनी वाकड पोलिसांमध्ये यासंदर्भात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी 22 मार्च रोजी केलेले भाषण हिंदू-मुस्लीम समाजात भांडण लावणार आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण राजकीय दबाबाखाली केले गेले. रमजान महिन्यात केलेल्या या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच राज ठाकरे यांना यापुढे भाषणासाठी परवानगी देऊ नये. मुंबईच्या माहिम समुद्रातील बेकायदा दर्ग्याचे व्हिडिओ, फोटो राज ठाकरे यांनी काल सभेत दाखवले होते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार होतात. एक महिन्यात हा दर्गा हटवा, नाही तर त्याच्या शेजारीच आम्ही गणेश मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता. गेल्या वर्षी राज यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा इशारा दिला होता. नंतर वर्षभर हा मुद्दा बाजूला पडला. आता पुन्हा त्यांनी भोंगे बंद करण्याचा इशारा देताना तेव्हा आंदोलन करणार्‍या 17 हजार मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दाही कालच्या सभेत उपस्थित केला होता. एका महिन्यापूर्वी याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांकडे एका गटाने तक्रार केली होती. तसेच, ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मशिदीला विरोध केला असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले होते. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईल दखल करू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

COMMENTS