भोपाळ : चहा प्यायल्याने एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या देवासमध्ये घडली आहे. चहा प्यायल्याने मुलाचा मृत्यू झा

भोपाळ : चहा प्यायल्याने एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या देवासमध्ये घडली आहे. चहा प्यायल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या आई केला आहे. मुलाला चहा प्यायल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सिमरोल पोलिसांनी सांगितले की, लहान मुलाचे वडील तुरुंगात असल्याने तो आपल्या आजोबांच्या घरी होता. मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, चहा दिल्यानंतरच मुलाला अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडल्याने त्यांनी त्याला इंदूरच्या चाचा नेहरू रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच मुलाचा मृत्यू झाला.
COMMENTS