Homeताज्या बातम्यादेश

नर्सरीतील मुलाने तिसरीच्या विद्यार्थ्यावर झाडली गोळी

बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील घटनेने खळबळ

पाटणा ः आजच्या डिजिटल युगात लहान मुले गेम्सच्या आहारी जात असल्याचे दिसून येत असतांनाच बिहारमधील सुपौल जिल्ह्यात नर्सरीत शिकणार्‍या मुलाने त्याच्य

महाक्रिटीकॉन २०२३ राज्यस्तरीय परिषदेचे शुक्रवारपासून आयोजन
साई गाव पालखी सोहळ्यासाठी वाहनांची नोंद करण्याचे आवाहन
अल्पवयीन मुलीचा विवाह, पाच जणांविरूध्द गुन्हा | DAINIK LOKMNTHAN

पाटणा ः आजच्या डिजिटल युगात लहान मुले गेम्सच्या आहारी जात असल्याचे दिसून येत असतांनाच बिहारमधील सुपौल जिल्ह्यात नर्सरीत शिकणार्‍या मुलाने त्याच्या शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाने गोळीबार का केला असावा? याचा तपास पोलिस करत आहेत. घटनेनंतर शाळेचा संचालक आणि मुख्य आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी शाळेवर हल्ला केला. संतप्त जमावाने मुख्याध्यापक कार्यालय आणि वर्गखोल्यांची तोडफोडही केली. या घटनेत जखमी झालेला विद्यार्थ्याला दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. शाळेचा मालक संतोष कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी सांगितले की, नर्सरीतील मुलाने त्याच्या शाळेच्या बॅगमध्ये बंदूक लपून आणली होती. त्याने बॅगेतून बंदूक काढून तिसरीतील मुलावर गोळीबार केला. या गोळीबारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक झालेल्या गोळीबाळामुळे शाळेतील मुले भीतीने सैरावैरा पळू लागली होती. तर काही मुले भीतीने शाळेच्या मुख्य दरवाजाकडे धावू लागली. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या मुलाच्या हाताला गोळी चाटून गेली असून त्याला किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस आणि शाळा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जेव्हा ते शाळेत पोहोचले तेव्हा त्यांना समजले की मुलाच्या हातात गोळी लागली आहे. घटनास्थळी बंदुकीचे मॅगझिनही पडलेले दिसले. 

COMMENTS