डंपिंग ग्राउंडला रात्री लागलेली आग अजूनही धुमसते

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 डंपिंग ग्राउंडला रात्री लागलेली आग अजूनही धुमसते

अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे मधील डंपिंग ग्राउंड ला रात्री लागलेली आग अजूनही आटोक्यात आली नाही. रात्री साडेसात च्या सुमारास तूर्भे म

मला चळवळीतून संपवण्याचा डाव : मनोज जरांगे
केजमध्ये उपजिल्हा रुग्णालयात चालले तरी काय?
गेवराई तालुक्यातील चार 33 के.व्ही. सबस्टेशनला मंजुरी

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील तुर्भे मधील डंपिंग ग्राउंड ला रात्री लागलेली आग अजूनही आटोक्यात आली नाही. रात्री साडेसात च्या सुमारास तूर्भे मधील डंपिंग ग्राउंडला अचानक आग लागल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवळपास सात ते आठ गाड्या पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग इतकी भीषण होती की, आटोक्यात आणणे शक्य नव्हते, रात्री उशिरा पर्यंत आग आटोक्यात येईल असे वाटले असताना, अजूनही आटोक्यात आली नाही. त्यामुळे आता ही आग विझविण्याचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर संपूर्ण नवी मुंबईतील कचरा इथे टाकला जातो. त्याच प्रमाणे पावसाळ्यात तोडलेली मोठ मोठी झाडे याच ठिकाणी टाकली असल्याने त्या झाडांमुळे आग आणखी वाढली. अग्निशमन दलाच्या गाड्या अजूनही आगीवर संपूर्ण नियत्रंण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र आग अजून संपूर्ण विजली नाही. मात्र अजूनतरी कुणाला दुखापत झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपार पर्यंत आग आटोक्यात येईल अशी शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे.

COMMENTS