Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट

दोघांच्या मृत्यूमुळे राज्यभरात अलर्ट जारी

तिरुअनंतपुरम ः कोरोना व्हायरसपासून सुटका झाली अशी अनेकांची समज असली तरी, या व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. केरळमध्ये आलेल

राहात्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
सोमैया महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन
पुण्यात 200 झोपड्यांवर रेल्वेचा हातोडा

तिरुअनंतपुरम ः कोरोना व्हायरसपासून सुटका झाली अशी अनेकांची समज असली तरी, या व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. केरळमध्ये आलेल्या नव्या व्हेरियंटमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट कोविड जेएन-1 चा रुग्ण आढळला आहे. वेगाने पसरणार हा व्हेरिएंट आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाने राज्यभरात या नव्या व्हेरिएंटबाबत अलर्ट जारी केला आहे.
केरळमधील दोन मृतांमध्ये कोझिकोड जिल्ह्यातील वट्टोली येथील 77 वर्षीय कालियाट्टुपरमबथ कुमारन आणि कन्नूर जिल्ह्यातील पनूर येथील 82 वर्षीय पलक्कंडी अब्दुल्ला यांचा समावेश आहे. केरळमध्ये नियमित देखरेखी दरम्यान, कोविड 19 च्या जेएन-1 उपप्रकाराचा रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी ही माहिती दिली. गेल्या काही आठवड्यांपासून केरळ राज्यामध्ये कोविड-19 च्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा सारख्या आजारांच्या प्रकरणांमधील नमुन्यांच्या संख्येत वाढ हे याचे कारण आहे. यापैकी बहुतेक रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे आहेत आणि हे रुग्ण कोणत्याही उपचाराशिवाय त्यांच्या घरीच स्वतःहून बरे होत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमित सरावाचा एक भाग म्हणून, सध्या राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये, त्यांच्या सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेच्या उपायांचे मूल्यांकन करण्यासाठी एक मॉक ड्रिल सुरू आहे.

COMMENTS