Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदेशाहीचे नवे राज्य, मात्र राज्यकर्ते जुनेच

खासदार लोखंडेकडून देवळालीकरांना पोलिस स्टेशनचे नवे गाजर

देवळाली प्रवरा प्रतिनिधी - गेल्या 24 वर्षात अनेक वेळा देवळाली प्रवरा पोलिस स्टेशन मंजुर झाल्याची घोषणा केली जाते. परंतू या पोलिस ठाण्याच्या पा

पाटणकर विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची सांगता
कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
महामंडळाच्या थकीत कर्ज व्याजावर ५० टक्के सवलत

देवळाली प्रवरा प्रतिनिधी – गेल्या 24 वर्षात अनेक वेळा देवळाली प्रवरा पोलिस स्टेशन मंजुर झाल्याची घोषणा केली जाते. परंतू या पोलिस ठाण्याच्या पायाभरणीचा शुभारंभ सुद्धा होवू शकला नाही. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर राहुरी फँक्टरी येथील शिंदे गटाचा (बाळासाहेबांची शिवसेना) मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात खासदार सदाशिव लोखंडे यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनचा प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मार्गी लावणार असल्याचे गाजर दाखवून कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लावले आहे.
या गाजरा मागे संघटना मजबुतीकरणाचे धोरण लपलेले मात्र जाहिर केले जात नाही. देवळाली प्रवरा येथील पोलिस स्टेशनचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन गृहमंञी तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे, तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तर माँडेल पोलिस स्टेशनची घोषणा केली होती. ही घोषणा आचारसंहितेत अडकली होती. गेल्या दोन एक वर्षापूर्वी आमदार लहू कानडे यांनी हा प्रश्‍न पुढे आणला. खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा पोलिस स्टेशनचे गाजर दाखवून प्रश्‍न ऐरणीवर आणला असला तरी खरंच पोलिस स्टेशन होईल का? की पुन्हा लालफितीच्या कारभारात अडकवून सर्वसामान्य नागरीकांना गाजर दाखवण्याचे काम होणार आहे. देवळाली प्रवरासह 32 गावाकरीता स्वतंत्र माँडेल पोलिस ठाण्यास तत्कालीन गृहमंत्री यांनी मंजुरी देवून घोषणा केली. परंतू नवीन पोलीस ठाणे लालफीतीच्या कारभरात अडकले गेले सध्या  देवळाली प्रवरासह 17 गावासाठी असणार्‍या पोलीस दुरक्षेञात (पोलीस चौकी) अवघे चार पोलीस कर्मचारी नियुक्तीला आहेत. पोलीस कर्मचार्‍यांना कायमच इतरञ नेमणूक केली जाते त्यामुळे चौकीचा  कारभार बंद अवस्थेत पाहण्यास मिळते.येथिल पोलीस कर्मचारी कायमच ताणतणात असल्याचे  तक्रारदारांना स्पष्टपणे जाणवत आहे. त्याचा  ञास तक्रारदार नागरीकांना  फिर्याद दाखल करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरासह 32 गावांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे देवळाली प्रवरात करण्यासाठी प्रस्ताव 1998-99 साली मा.आ.चंद्रशेखर पा. कदम यांनी दाखल केला होता. नगरपालिका कार्यालयाशेजारी पोलीस ठाण्यासाठी भव्य जागा महाराष्ट्र पोलीसांच्या नावावर आहे. या जागेची तत्कालीन अधिका-यांनी वेळोवेळी पाहणी केली आहे. 20 नोव्हेंबर 2014 रोजी तत्कालीन पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे यांच्यासह श्रीरामपुर विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक अंबादास गांगुर्डे, तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक रजपुत यांनी पाहणी करुन 15 दिवसाच्या आत भुमीपूजन करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु त्यावेळीही पोलीस ठाण्याचे भुमीपूजन झाले नाही.
           माजी आमदार कदम यांनी सातत्याने पोलीस ठाण्याचा प्रस्तावाचा पाठपुरावा करुन तो मंजुरीसाठी घेण्यात यावा यासाठी वेळोवेळी गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, गृहसचिव यांच्या भेटी घेतल्या. 2004 ते 2009 या कालावधीमध्ये विधानसभा सदस्य असतांना चंद्रशेखर कदम यांनी विधानसभेत देवळाली प्रवरा पोलीस ठाणे होण्यासाठी प्रश्‍न उपस्थित केलेला होता. त्यावेळी लवकरच पोलीस ठाणे करण्याचे आश्‍वासन मिळाले होते. परंतु राजकीय डावपेच यामुळे पोलीस ठाण्याची मंजुरी लांबणीवर पडली होती.2014 ते 2019 या कालावधीत शिवसेना शहर प्रमुख सुनिल कराळे यांनी विविध प्रकारची आंदोलने छेडली परंतू सत्ताधार्‍यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.शेवटी   मुख्यमंत्री यांच्या निवासस्थाना समोर आत्मदहन  करण्याचा इशारा देताच तत्कालीन गृहराज्यमंञी ना.दिपक केसरकर यांनी देवळाली प्रवरा स्वतंञ माँडेल पोलीस ठाण्यास परवानगी देवून सहा महिण्याच्या आत पोलीस ठाणे सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. परंतू लोकसभा व विधानसभा आचार संहितेमुळे  स्वतंञ पोलीस स्टेशन लालफितीच्या कारभारात अडकले. तालुक्याचे ठिकाण असलेले राहुरी शहर, देवळालीप्रवरा, वांबोरी, बारागावनांदुर, मांजरी,सोनगाव सात्रळ, म्हैसगाव, ताहाराबाद सह 96 गावे असलेला राहुरी तालुका दोन नगरपरिषदा,दोन साखर कारखाने,दहा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आसलेले राज्यातील पहीले कृषी विद्यापीठ,रेल्वे स्टेशन,शिर्डी शनिशिंगणापूर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तिर्थस्थळांना जोडणारे राज्य महामार्ग क्रमांक 10 वरिल जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका तसेच भौगोलिक क्षेत्रफळानेही विस्तारलेला पश्‍चिमेकडील दुर्गम भाग असलेला राहुरी तालुक्यात पोलीस ठाणे मात्र एकच 96 गावांचा गृहखात्याचा भार सांभाळण्याची जबाबदारी अवघ्या 78 पोलीसांवर आहे. राहुरी तालुक्याला प्रमुख पोलीस ठाणे आहे राहुरी शहरात या पोलीस ठाण्यात पोलीस बळ  78 आहे.यात एक पोलीस निरिक्षक,एक तीन उपनिरिक्षक, दहा सहा.फौजदार, पो.ना.सत्तेचाळीस,राहुरी पोलिस ठाण्याअंतर्गत एकूण आठ बीट आहेत  तर दोन औट पोस्ट अशी एकूण पोलीस बळसंख्या व कार्यक्षेत्र राहुरी पोलीस ठाण्याचे आहे.
राहुरीच्या 96 गावांचे अंतर पाहता मांजरी हे पूर्वेकडील शेवटचे गाव 24 कि.मी.अंतरावर नेवासा तालुक्याच्या हद्दीला लागून आहे. पश्‍चिमेकडील दुर्गम भागातील म्हैसगाव कोळेवाडी याचे अंतर साधारण 26 कि.मी.संगमनेर तालुक्याच्या हद्दीला लागून आहे. दक्षिणेकडे असलेले वांबोरी शहरापासून पुढे असलेले कात्रड गुंजाळे गाव 28 कि,मी.अंतरावर नेवासे व नगर तालुक्याच्या सिमेला लागून आहे. तर उत्तरेकडील सोनगाव सात्रळ हे प्रवरा परिसरात राहाता तालुक्याच्या हद्दीला 22 कि.मी.अंतरावर आहे. तालुक्याच्या सिमा या साधारणतः 22 ते 28 कि.मी.अंतरावर येतात. यात दुर्गम भाग व भौगोलिक स्थिती व गुन्हेगारीचा आलेख पाहता, राहुरीत गुन्ह्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. यात दाखल असलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
            राहुरी फॅक्टरी, श्रीरामपूर रोड येथील श्री.दत्त लॉन्स येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सन्मान सोहळा खा.लोखंडे यांच्या हस्ते पार पडला प्रसंगी ते बोलत होते.यावेळी  शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब म्हसे, राहुरी तालुका प्रमुख सुनील कराळे,श्रीरामपूर तालुका प्रमुख बापू शेरकर,शाम गोसावी, राजेंद्र लांडगे,संपत महाराज जाधव,जयेश वाकचौरे आदी उपस्थित होते.

शिंदे सरकार देवळालीकरांचे स्वप्न पुर्ण करणार का? – 1998-99 साला पासुन देवळाली प्रवरात स्वतंञ पोलिस स्टेशन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.माजी आ.चंद्रशेखर कदम हे भाजपाच्या पक्षातून राहुरीचे आमदार झाले होते.त्यावेळी आ.कदम यांनी पोलिस स्टेशनचा प्रश्‍न विधानसभेत उपस्थित करुन गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, गृहसचिव यांच्या भेटी घेतल्या. परंतू यश आले नाही. आज ही स्वतंत्र पोलिस स्टेशन करीता पञव्यवहार सुरुच आहे.2014 पासुन शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे यांनी विविध प्रकारची आंदोलने छेडली परंतू सत्ताधार्‍यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. वास्तविक पाहता भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्याने हा प्रश्‍न सुटणे अपेक्षित होते. मात्र तसे काही चिन्ह दिसत नाही. महाविकास आघाडी सरकार जावून शिंदे भाजप सरकार सत्तेत आले आहे. शिंदे सरकारमध्ये तत्कालीन गृहमंञी प्रा. राम शिंदे, दीपक केसरकर उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस हे सर्व सरकार मध्ये आहे. खा.सदाशिव लोखंडे यांच्या मागणीला हिरवा कंदिल मिळो नव्हे पोलिस स्टेशनचे भुमिपुजनाचा कार्यक्रमच व्हावा अशीच अपेक्षा देवळालीकरांची आहे.

COMMENTS