Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवराज्याभिषेकासाठी मुस्लिम तरुणाने आणले गंगाजल

जामखेडला शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

जामखेड ः जामखेड तालुक्यात जून्या नव्या पिढीतील लोकांकडून सातत्याने विविध कामातुन सामाजिक, जातीय सलोखा जपला जात आहे.  जामखेडला दरवर्षी तिथीनुसार श

pathardi : गांजाची राखण करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात l LokNews24
काळविटाच्या शिकारीतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्याला बक्षीस : सागर केदार
जेऊर कुंभारी येथे कोरोना नियमांचे पालन करत भीम जयंती साजरी

जामखेड ः जामखेड तालुक्यात जून्या नव्या पिढीतील लोकांकडून सातत्याने विविध कामातुन सामाजिक, जातीय सलोखा जपला जात आहे.  जामखेडला दरवर्षी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा विविध सामाजिक, प्रेरणादायी ऐतिहासिक कार्यक्रमद्वारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया थाटात साजरा केला जातो. या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सप्तनद्यांच्या पाण्याने जलाभिषेक दिला जातो.
यासाठी भारतातील सात नद्यांचे पाणी मिळण्याचे नियोजन पांडूराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्तांकडून केले जाते. या वर्षी जामखेड येथील समीर शेख या तरुणाने जामखेड ते हरिद्वार सायकल प्रवास केला. मध्यप्रदेश राज्यातून सायकल प्रवास करत असताना खलघात येथून नर्मदा नदीचे पाणी तसेच हरिद्वार येथून गंगा नदीचे पाणी या शिवराज्याभिषेकात प्रतिमेच्या जलाभिशेकासाठी आणले. समीर शेख हे दरवर्षी 1जानेवारिला भारतात ठरलेल्या ठिकाणी सायकल प्रवास करतात. यावेळी 1 जानेवारी 2024 रोजी जामखेड ते हरिद्वार 2000किमी सायकल प्रवास करत 10 दिवसात हरिद्वार ला पोहोचले होते.  पांडूराजे भोसले यांच्याशी सायकलस्वार समीर शेख यांची जलाभिषकासाठी लागणारया गंगाजला बाबत चर्चा झाली होती. पांडुराजे भोसले यांनी समीर यांना हरिद्वार सायकल प्रवासात खलघात येथून नर्मदा नदीचे पाणी तसेच हरिद्वार येथून गंगा नदीचे पाणी आणण्याची जबाबदारी दिली होती. ही जवाबदारी समीर शेख यांनी पार पाडली. दि 16 जून रोजी सदर नद्यांचे पाणी पांडुराजे भोसले यांच्या स्वाधीन केले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे तालूकाध्यक्ष पांडुराजे भोसले, जामखेड तालूका डॉक्टर असोशियनचे सचिव डॉ सादेक पठाण, प्रदिप टापरे, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ म्हेञे, बूवा जगदाळे, अँड घनश्याम राळेभात आदि उपस्थित होते. जामखेड तालुक्यात प्रत्येक धर्मात समीर शेख यांच्यासारखे अनेक लोक आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामाजिक सलोखा जपण्याचे व सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहेत.

COMMENTS