Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलतेवाडी येथील बेपत्ता युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील केरा विभागातील सलतेवाडी (बिबी) येथील बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्या

संविधान दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
पंढरपूर-घुमान यात्रेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते शुभारंभ
सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील केरा विभागातील सलतेवाडी (बिबी) येथील बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह बिबी गावालगतच्या पाझर तलावात रविवारी सकाळी आढळला.
याबाबत पाटण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल रघुनाथ सलते (रा. सलतेवाडी, बीबी, ता. पाटण) हा युुवक गुरूवार, दि. 3 रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून बेपत्ता होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तपास लागला नाही. याबाबतची तक्रार मयताचा भाऊ जगन्नाथ रघुनाथ सलते यांनी दि. 4 रोजी पाटण पोलिसांत दिली होती.
दोन दिवस होऊनही राहुलचा तपास लागला नव्हता. अखेर रविवारी सकाळी 8 वाजता राहूल याचा मृतदेह बिबी गावालगत असलेल्या पाझर तलावात तरंगताना आढळून आला. यानंतर मृतदेह सापडल्यानंतर कुटूंबीयांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी पाटण पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीस तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेण्यात आला. अधिक तपास हवालदार पावरा करत आहेत.

COMMENTS