Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात अल्पवयीन मुलावर तलवारीने वार

सहकारनगर पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात

पुणे ः पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चारजणांनी अल्पवयीन मुलावर तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी आरोपींना सहकारनगर पोलिसांनी

केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावा : उपमुख्यमंत्री पवार
 प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पुणे ः पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चारजणांनी अल्पवयीन मुलावर तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी आरोपींना सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना पद्मावती परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 17 वर्षीय असून काही दिवसांपूर्वी त्याचे आरोपीसोबत भांडण झाले होते. त्याच रागातून आरोपीने इतर अल्पवयीन साथीदारांना बोलावून घेत तक्रारदार यास गाठले. त्याच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर बांबूने मारहाण करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत आरोपींवर पोलिसांनी आर्मस क्ट आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. एन. खेतमाळीस पुढील तपास करीत आहेत. पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 40 हजारांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना हडपसरमधील बालाजी सीएनजी पंपासमोर घडली आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला दहा डिसेंबरला रात्री बालाजी सीएनजी पेट्रोलपंपाजवळ थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 40 हजारांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे दुचाकीवर पसार झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपींचा माग काढणे सुरू केले आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS