Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलाने केली 8 वर्षीय मुलीची हत्या

मुंबई ः मुंबईत वसई येथे इयत्ता तिसरीत शिकणार्‍या एका 8 वर्षीय मुलीचा मृतदेह हा तिच्या घरा शेजारील बंद खोलीत कुजलेल्या आणि हातपाय बंदलेल्या अवस्थे

पुण्याच्या किशोर आवारे यांची हत्या
दर्ग्याच्या आवारात धारधार शस्त्राने वार करून दोघांची हत्या
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या !

मुंबई ः मुंबईत वसई येथे इयत्ता तिसरीत शिकणार्‍या एका 8 वर्षीय मुलीचा मृतदेह हा तिच्या घरा शेजारील बंद खोलीत कुजलेल्या आणि हातपाय बंदलेल्या अवस्थेत प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला होता. ही मुलगी दोन दिवसांपासूंन बेपत्ता होती. दरम्यान, या मुलीच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी काही तासात केला आहे. तिच्या घराशेजारी राहणार्‍या 14 वर्षीय मुलाने तिची हत्या केली असून त्याला पोलिसांनी जालना येथून अटक केली आहे. या मुलाने कौटुंबिक वादातून मुलीचा खून केल्याचे उघड झाले आहे. तसेच मुलाला वाचवण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी मुलाच्या वडिलांना आणि आईला देखील अटक करण्यात आली आहे.

COMMENTS