Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार

पुणे ः एका कापड दुकानात कामास असलेल्या सतरा वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून ओळखीच्या एका तरुणानी जबरदस्तीने बलात्कार केला. तरुणीचे आक्षेपार्ह फ

पुसेगाव येथे बैलबाजार न भरल्याने शेतकरी अडचणीत
पोटच्या २ मुलांची हत्या करून आईने केली आत्महत्या;कारण ऐकून व्हाल थक्क | LOK News 24
न्यूझीलंडचे ग्रँट ब्रॅडमन पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक

पुणे ः एका कापड दुकानात कामास असलेल्या सतरा वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून ओळखीच्या एका तरुणानी जबरदस्तीने बलात्कार केला. तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याचे धमकी देत, त्यानंतरही तिच्यावर जबरदस्ती केली. तसेच मुलीच्या आईच्या मित्राने देखील संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील, तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले. यामुळे सदर मुलगी गर्भवती झाली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात मुलीच्या आईसह दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अविनाश शेळके( राहणार-वाघोली, पुणे) व गोविंद वाकडे (राहणार-वाघोली, पुणे)या आरोपींसह मुलीच्या 36 वर्षीय आईवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर मुलगी ही एका कापड दुकानात कामास असून तिच्या ओळखीचा आरोपी अविनाश शेळके यानी तिला लग्नाचे आमिष दाखवले. मार्च 2024 मध्ये तिच्यासोबत त्याने दोन ते तीन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तसेच आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये मुलीचे उघडे फोटो काढले होते. ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा दोन वेळा जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध केले. तसेच मुलीच्या आईचा मित्र गोविंद काकडे यानी मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील, तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय वंजारी पुढील तपास करत आहे.

COMMENTS