Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

पीडित मुलगी 7 आठवड्यांची गर्भवती

पुणे ः पुण्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही मुलगी 15 वर्ष 9 महिन्यांची असून, तिला लग्न

माधुरीबद्दल ‘आक्षेपार्ह शब्द’ वापरणं नेटफ्लिक्सला भोवलं
शेतकर्‍यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला : रघुनाथदादा पाटील याचे आवाहन
ब्राम्हणगावात जागर लोकशाहीचा महोत्सव उत्साहात

पुणे ः पुण्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही मुलगी 15 वर्ष 9 महिन्यांची असून, तिला लग्नाचे अमिष दाखवून बळजबरीने बलात्कार करणार्‍या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पिडित मुलगी 7 आठवड्यांची गर्भवती झाल्यानंतर तिच्यावर तरुणाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.
शिवराज महेश गायकवाड (वय 19, रा. गुजरवाडी, कात्रज,पुणे ) असे अटक करण्यत आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार मुलगी आणि आरोपी गायकवाडची ओळख झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला असतानाही त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मुलगी गर्भवती झाल्यावर याबाबतची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजली. त्यावेळी आरोपी गायकवाडने तिच्यावर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी गायकवाड विरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वास भाबड पुढील तपास करत आहेत.

COMMENTS